• ८ जून अर्थात जागतिक महासागर दिनाच्या निमित्ताने नॅशनल जिओग्राफिक मासिकामार्फत (National Geographic Magazine) 'दक्षिण महासागर (Southern Ocean)' हा जगातील ५ वा महासागर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • अटलांटिक, हिंदी, पॅसिफिक आणि आर्क्टिक हे जगातील इतर ४ महासागर आहेत.

  • दक्षिण महासागर हा एकमेव महासागर आहे ज्याचा संपर्क इतर ३ म्हणजेच पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी या महासागरांशी आहे.

  • दक्षिण महासागराचा प्रवाह अंटार्क्टिकाच्या सभोवताल पश्चिमेकडून पूर्वेस वाहतो.