• संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत नुकतीच कॅथरीन रसेल यांची UNICEF च्या नूतन प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • रसेल या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सहाय्यक आहेत.

  • त्या व्हाईट हाऊस ऑफ प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसच्या प्रमुख देखील आहेत.

UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय मुलांचा आपत्कालीन निधी होय.

  • प्रमुख: कॅथरीन रसेल सध्या UNICEF च्या प्रमुख पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UNICEF चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.