• जागतिक जी - २० समिटचे आयोजन युरोपियन कमिशनने इटलीच्या सहकार्याने यशस्वीरीत्या केले आहे.

ठळक मुद्दे

  • कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये तसेच जी - २० अध्यक्षीय भागाचा एक भाग म्हणून सदर समिट महत्वाची आहे.

  • कोविड - १९ साथीच्या आजारांवर विजय मिळविण्यासाठी समिटने अजेंडा स्वीकारला आहे.

जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: किंग सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.