• गुजरातमधील कांडला हे देशातील पहिले 'हरित विशेष आर्थिक क्षेत्र (Special Economic Zone - SEZ)' बनले आहे.

ठळक मुद्दे

  • कांडलाला CII चे 'भारतीय हरित इमारत परिषदेमार्फत (Indian Green Building Council - IGBC)' नुकतेच 'ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग (Green Cities Platinum Rating)' प्रदान करण्यात आले आहे.

IGBC बद्दल महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IGBC म्हणजेच Indian Green Building Council अर्थात 'भारतीय हरित इमारत परिषद' होय.

  • विशेषता: IGBC हे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (Confederation of Indian Industries - CII) चा भाग आहे.

  • स्थापना वर्ष: २००१ साली IGBC ची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थेचे उद्दिष्ट: 'सर्वांसाठी शाश्वत अंगभूत पर्यावरण प्रदान करणे आणि २०२५ पर्यंत शाश्वत अंगभूत पर्यावरणात भारताला जागतिक महत्वाच्या राष्ट्रांपैकी एक बनण्यासाठी प्रोत्साहित करणे' हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.