-
नागरी उड्डयन मंत्री श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यामार्फत नुकतेच तेलंगणामध्ये 'मेडीसीन फ्रॉम द स्काय (Medicine from the Sky)' उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
ड्रोनचा वापर करून दुर्गम भागात लस तसेच इतर अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणे हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तेलंगणाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: के. चंद्रशेखर राव हे सध्या तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: तमिलीसाई सौंदराराजन हे सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
-
स्थापना वर्ष: २ जून २०१४ रोजी तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली होती. २ जून हा 'तेलंगणा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो.
-
राजधानीचे ठिकाण: हैद्राबाद हे तेलंगणाच्या राजधानीचे ठिकाण आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने तेलंगणा हे देशात ११ व्या स्थानावर विराजमान आहे.