-
यंदाच्या टी - २० विश्वचषकासाठी भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीची नुकतीच भारतीय संघाचा मार्गदर्शक (Mentor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये यूएई व ओमानमध्ये संपन्न होणाऱ्या या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर BCCI तर्फे सदर घोषणा करण्यात आली आहे.
-
धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
-
टी - २० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एकदिवसीय विश्वचषक या ३ प्रमुख ICC ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान त्याने मिळविला आहे.
-
त्याच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा सध्याच्या भारतीय संघाला व्हावा या हेतूने सदर निर्णय घेण्यात आला आहे.
BCCI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: BCCI म्हणजेच 'Board of Control for Cricket in India' अर्थात 'भारतीय क्रिकेट नियामक मंडळ' होय.
-
अध्यक्ष: सौरव गांगुली हे सध्या BCCI अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
-
सचिव: जय शाह हे सध्या BCCI सचिव म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे BCCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९२८ साली BCCI ची स्थापना करण्यात आली होती.
-
पुरुष संघ प्रशिक्षक: रवी शास्त्री हे सध्या पुरुष संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
-
महिला संघ प्रशिक्षक: रमेश पोवार हे सध्या महिला संघ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.