-
आंध्र प्रदेश सरकारमार्फत नुकतेच ‘स्वेच्छा (Swechha)’ कार्यक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी मासिक पाळीशी संबंधित अडचणी हाताळण्यासाठी तसेच महिलांच्या वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी सदर कार्यक्रमाचे अनावरण केले आहे.
आंध्र प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली होती.
-
राज्यपाल: विश्वभूषण हरीचंदन हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: वाय. एस. जगनमोहन रेड्डी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने आंध्र प्रदेश राज्य देशात ७ व्या क्रमांकावर आहे.