-
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (Jawaharlal Nehru University - JNU) परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
प्रसिद्ध शिल्पकार नरेश कुमावत यांना JNU परिसरात स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची निर्मिती करण्यासाठी सुमारे ७ महिने इतका कालावधी लागला.
-
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यापासून साधारणतः ३०० मीटर अंतरावर स्वामी विवेकानंदांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
-
सदर कार्यक्रमास केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' आणि JNU चे कुलगुरू श्री. जगदेश कुमार उपस्थित होते.