• भारत सरकारची नवरत्न कंपनी एनएलसी इंडिया लिमिटेड (Neyveli Lignite Corporation India Limited - NLCIL) ला स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाच्या' अंमलबजावणीत अत्यंत मोलाचे योगदान दिल्याबद्दल 'स्वच्छता ही सेवा पुरस्कार' मिळाला आहे.

ठळक मुद्दे

  • NLCIL चे सीएमडी श्री. राकेश कुमार यांनी संपूर्ण नेवेलीला प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि हरित कॅम्पसमध्ये बदलत 'स्वच्छता ही सेवा २०१९' पुरस्कार जाहीर करण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्वच्छ भारत मिशनचा पुढाकार म्हणून 'स्वच्छता ही सेवा' हा उपक्रम माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू करण्यात आला होता.

  • NLCIL ने सदर कार्यक्रम २ टप्प्यांमध्ये राबविला होता.

  • पहिला टप्पा ११ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर २०१९ दरम्यान आणि दुसरा टप्पा ३ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत राबवण्यात आला होता.

एनएलसीआयएल (NLCIL) बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९५६ साली NLCIL ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नेवेली, तमिळनाडू हे NLCIL चे मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संस्थेचा प्रकार: NLCIL ही 'सार्वजनिक क्षेत्र उपक्रम' स्वरूपात मोडते.