-
'भारतीय निवडणूक आयोगामार्फत (Election Commission of India - ECI)' नुकतेच 'पद्धतशीर मतदारांचे शिक्षण आणि निवडणूक सहभाग (Systematic Voters’ Education and Electoral Participation - SVEEP)' सल्लागार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर कार्यशाळेचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा तसेच निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह एका नवीन उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.
-
SVEEP योजनांचा आढावा घेणे तसेच SVEEP च्या महत्त्वाच्या बाबींवर व्यापक चर्चा करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
ECI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ECI म्हणजेच Election Commission of India अर्थात भारतीय निवडणूक आयोग होय.
-
मुख्य निवडणूक आयुक्त: सुशील चंद्रा हे सध्या मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
निवडणूक आयुक्त: राजीव कुमार आणि अनुपचंद्र पांडे हे सदर पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: २५ जानेवारी १९५० रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.