• केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांनी मानव आणि हत्ती यांच्यात निर्माण होणाऱ्या संघर्षावरील 'सुरक्षा' या नावाने  राष्ट्रीय पोर्टल सुरू केले आहे. अद्ययावत माहिती संकलित करणे हे पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच त्या आधारावर संघर्ष व्यवस्थापित करणे क्रमप्राप्त आहे.

ठळक मुद्दे

  • 'जागतिक हत्ती दिन' या १२ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय वार्षिक कार्यक्रमाचे साजरीकरण करताना सदर राष्ट्रीय पोर्टलचे अनावरण करण्यात आले.

  • वन्य क्षेत्रातून अपहरण करण्यात आलेल्या हत्तींच्या संरक्षणासाठी हत्तींबाबत संवर्धन आणि ज्ञानाचे सामायिकीकरण करण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो.

  • पोर्टलच्या माध्यमातून माहिती संकलन प्रोटोकॉल, माहिती व्हिज्युअलायझेशन टूल्स आणि माहिती ट्रांसमिशन पाइपलाईन सेट करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.