• ओडीशा राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत राज्यातील संपूर्ण शहरी भागामध्ये दर्जेदार पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरवण्यासाठी 'सुजल (Sujal Drink from Tap Mission)' योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील शहरी भागात मार्च २०२२ पर्यंत पाणी जोडणी देण्याचे लक्ष्य ओडीशा राज्याने ठेवलेले आहे.

  • बहुसंख्य लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने सदर योजनेसाठी राज्य सरकारतर्फे १३०० कोटी रुपये अनुदान निश्चित करण्यात आले आहे.

  • योजनेचा यशस्वी अंमल पार पडल्यास शहरी भागात दर्जेदार पिण्यायोग्य नळाचे पाणी पुरवणारे ओडीशा हे देशातील पहिले राज्य बनेल अशी अपेक्षा आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.