-
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडिशाच्या बालासोरच्या अंतरिम चाचणी रेंजमधून 'अभ्यास (ABHYAS)' या 'हाय-स्पीड एक्स्पेंडेबल एरियल टार्गेटची (High-speed Expendable Aerial Target - HEAT)' यशस्वी उड्डाण चाचणी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
'अभ्यास (ABHYAS)' चा उपयोग विविध क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी लक्ष्य म्हणून केला जाऊ शकतो.
-
'अभ्यास (ABHYAS)' ची रचना आणि विकास DRDO च्या 'एरोनॉटिकल डेव्हलपमेंट आस्थापना (Aeronautical Development Establishment - ADE)' द्वारे करण्यात आली आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.