-
भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक वर्ष २०२१-२२ साठीच्या चौथ्या द्विमासिक धोरण बैठकीत पत धोरण समितीमार्फत (Monetary Policy Committee - MPC) दर अपरिवर्तित ठेवण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
पत धोरण समितीने रेपो दर ४ टक्के इतका अपरिवर्तित ठेवला आहे.
-
रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के ठेवण्यात आला आहे.
महत्वपूर्ण दर
-
पॉलिसी रेपो दर (Policy Repo Rate): ४%
-
रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate): ३.३५%
-
सीमांत स्थायी सुविधा दर (Marginal Standing Facility Rate): ४.२५%
-
बँक दर (Bank Rate): ४.२५%
-
CRR: ४%
-
SLR: १८%
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच 'Reserve Bank of India' अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.