ठळक मुद्दे
-
अरुणाचल प्रदेश राज्य सरकारमार्फत भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत आपल्या राज्याला आणण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. सीमाप्रश्नांबाबत अरुणाचल प्रदेश लवकरच आसाम राज्य सरकारशी चर्चा सुरू करणार आहे.
सहाव्या अनुसूचीबाबत महत्वपूर्ण माहिती
-
भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये आसाम, त्रिपुरा, मेघालय आणि मिझोरममधील आदिवासी भागांच्या प्रशासनाबाबतची तरतूद नमूद करण्यात आलेली आहे.
-
सहाव्या अनुसूचीद्वारे वरील राज्यांमधील आदिवासी लोकांच्या हक्कांना संरक्षण प्राप्त होते.
-
संविधान सभेद्वारे स्थापन करण्यात आलेलेल्या बारडोलोई समितीच्या अहवालाच्या आधारे याचा समावेश करण्यात आला.
अरुणाचल प्रदेश राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: पेमा खांडू सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: बी. डी. मिश्रा सध्या राज्यपाल पदावर आहेत.
-
केंद्र शासित प्रदेश निर्मिती: २१ जानेवारी १९७२ रोजी अरुणाचल प्रदेशची केंद्र शासित प्रदेश म्हणून निर्मिती करण्यात आली होती.
-
राज्य म्हणून मान्यता प्राप्त वर्ष: २० फेब्रुवारी १९८७ रोजी अरुणाचल प्रदेशला राज्य म्हणून मान्यता प्राप्त झाली होती.