-
संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग यांनी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 'श्रीजन' या ऑनलाइन पोर्टलचे अनावरण केले.
ठळक मुद्दे
-
भारतीय संरक्षण उद्योगाद्वारे सध्या आयात केल्या जाणार्या वस्तू प्रदर्शित करण्यासाठी हे पोर्टल निर्माण करण्यात आले आहे.
-
देशांतर्गत उद्योगांना यामुळे या विशिष्ट वस्तूंवर अधिक लक्ष केंद्रित अभ्यास करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
-
भारत सरकारमार्फत या वस्तूंच्या रचना, विकास आणि निर्मितीला चालना देण्यासाठी उच्च प्रोत्साहन व प्रमुख कार्यक्रमांची आखणीही प्रदान करण्यात येत आहे.
-
पोर्टलमुळे या वस्तूंचे उत्पादन देशात करून भारतीय संरक्षण उद्योगांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
-
भारताची संरक्षण आयात यामुळे कमी होईल आणि संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशीकरणाला चालना मिळेल असा दुहेरी फायदा अपेक्षित आहे.