-
'स्लिनेक्स (SLINEX) - २०' हा भारत-श्रीलंका दरम्यान होणारा ८ वा सागरी युद्ध सराव नुकताच सुरु झाला आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय नौदल (Indian Navy - IN) आणि श्रीलंका नौदल (Sri Lanka Navy - SLN) यांच्या दरम्यान हा ८ वा द्विपक्षीय वार्षिक सागरी युद्ध सराव १९ ते २१ ऑक्टोबर २०२० या कालावधी दरम्यान पार पडणार आहे.
SLINEX- २० बाबत महत्वपूर्ण माहिती
-
परस्पर समन्वय सुधारणा करणे तसेच दोन्ही नौदलांदरम्यान बहु-पक्षीय सागरी ऑपरेशनसाठी सर्वोत्तम पद्धती आणि प्रक्रियेची देवाणघेवाण करणे या उद्देशांसाठी हा सराव अत्यंत महत्वपूर्ण आहे.
-
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हा सराव संपर्करहित स्वरूपामध्ये आयोजित केला जात आहे.