• स्कायरूट एरोस्पेस या स्पेसटेक स्टार्टअपने अप्पर स्टेज रॉकेट इंजिन 'रमन' ची यशस्वीरित्या चाचणी घेतली. सदर चाचणीद्वारे स्कायरूट एरोस्पेस ही स्वदेशी रॉकेट इंजिन बनवण्याची क्षमता दर्शविणारी पहिली भारतीय खाजगी कंपनी बनली आहे.

ठळक मुद्दे

  • 'रमन' हे थ्रीडी प्रिंट केलेले रॉकेट इंजिन आहे ज्याला नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सी. व्ही. रमन यांचे नाव देण्यात आले आहे.

  • स्कायरूट एरोस्पेसने आपले पहिले रॉकेट लाँच करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जे २५०-७०० किलो वजनाच्या उपग्रहांना डिसेंबर २०२१ पर्यंत पृथ्वीच्या निम्न कक्षेत झोकून देऊ शकेल.