-
अंदमान समुद्रात भारत, सिंगापूर आणि थायलंड या देशांदरम्यान त्रिपक्षीय सागरी सराव SITMEX-२० ची दुसरी आवृत्ती घेण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सरावाची २०२० ची आवृत्ती रिपब्लिक ऑफ सिंगापूर नौदलामार्फत (Republic of Singapore Navy - RSN) आयोजित करण्यात आली आहे.
-
भारतीय नौदल (Indian Navy - IN) स्वदेशी जहाजे कमोर्टा आणि कार्मुक या सरावामध्ये सहभागी झाले होते.
-
परस्पर आंतर-कार्यक्षमता वाढविणे, परस्पर संबंध बळकट करणे आणि क्षेत्रातील एकंदर सागरी सुरक्षा वाढविणे या उद्देशांसाठी SITMEX सराव मालिका आयोजित केली जात आहे.