• आसाम राज्य सरकारमार्फत नुकतेच कोविड - १९ मुळे अनाथ मुलांसाठी 'मुख्यमंत्री शिशु सेवा योजनेचे (Chief Minister Sishu Seva Scheme)' अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांच्या हस्ते सदर योजनेचे अनावरण संपन्न झाले.

  • ज्या लाभार्थ्यांचे कोविडमुळे दोन्ही पालक गमावले गेले आहेत त्यांना आर्थिक मदतीचा आधार या योजनेंतर्गत मिळणार आहे.

आसाम राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राजधानी: दिसपूर ही सध्या आसामची राजधानी आहे.

  • राज्यपाल: जगदीश मुखी हे सध्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: हिमंता बिस्वा सरमा हे सध्या मुख्यमंत्री पदावर आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: २६ जानेवारी १९५० रोजी आसामला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.