• सर डेविड अ‍ॅटनबरो यांना सन २०१९ साठीच्या प्रतिष्ठित इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • ते इंग्रजी प्रसारक आणि इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

  • बीबीसी नॅचरल हिस्ट्री विभाग (BBC Natural History) लिहीण्यासाठी तसेच सादर करण्यासाठी ते लोकप्रिय आहेत.

  • ग्रहावरील जैवविविधतेचे जतन व संरक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

इंदिरा गांधी शांतता पुरस्काराबाबत महत्वपूर्ण माहिती

  • पुरस्काराची स्थापना: १९८६ साली पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती.

  • पुरस्काराचा उद्देश: शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या उद्देशांसाठी हा पुरस्कार आहे.

  • पुरस्कार वितरण कार्य: १९८६ पासून दरवर्षी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून हा पुरस्कार देण्यात येत आहे.

  • पुरस्कार रक्कम: २५ लाख रुपये इतकी या पुरस्काराची रक्कम आहे.