-
अंदमान समुद्रामध्ये भारत - सिंगापूर द्विपक्षीय सागरी युद्ध सराव SIMBEX-२० ची २७ वी आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्दे
-
भारतीय नौदल (Indian Navy - IN) २०२० सालच्या SIMBEX आवृत्तीची आयोजक आहे.
-
१९९४ पासून दरवर्षी भारतीय नौदल आणि रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही (Republic of Singapore Navy - RSN) यांच्यात SIMBEX सरावाचे आयोजन करण्यात येते.
-
परस्पर आंतर-कार्यक्षमता वाढविणे तसेच सर्वोत्तम पद्धती आत्मसात करणे हे सदर सरावाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.