-
सिडबी अर्थात लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाने (Small Industries Development Bank of India - SIDBI) ट्रान्स युनियन सिबिलच्या (TransUnion CIBIL) संयुक्त विद्यमाने 'MSME सक्षम' नावाचे एक ज्ञान पोर्टल सुरू केले आहे. वित्तपुरवठा आणि आर्थिक जागरूकता याबाबतीत उल्लेखनीय कार्य पार पाडण्याच्या उद्देशाने हे पोर्टल कार्यरत राहील. MSMEs च्या विकासाच्या दृष्टीने हे अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
ठळक मुद्दे
-
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकरिता (Micro, Small and Medium Enterprises - MSMEs) व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे
-
'MSME सक्षम' हे MSME साठी एक व्यापक आर्थिक शिक्षण तसेच ज्ञानाचे व्यासपीठ म्हणून अत्यंत उपयुक्त स्वरूपाचे आहे
-
ते त्यांची सर्वकष पत कर्तव्ये पार पाडण्यास समर्थन करण्याबाबत अग्रणी भूमिका बजावेल
-
MSMEs ना वित्तपुरवठा व त्वरित प्रवेश प्रदान करेल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या जागरूक आणि कर्जासाठी तयार करेल जेणेकरून वेळेवर आणि परवडणारी आर्थिक मदत त्यांना प्राप्त होईल
SIDBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: SIDBI ची स्थापना २ एप्रिल १९९० रोजी झाली होती
-
संस्थेचे स्वरूप: 'भारतातील एक विकास वित्तीय संस्था' या स्वरूपात सध्या SIDBI कार्यरत आहे
-
मुख्यालय: SIDBI चे मुख्यालय लखनौ, उत्तर प्रदेश येथे आहे
-
संस्थेचा उद्देश: उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देऊ करणे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून काम करणे हा SIDBI चा मुख्य उद्देश आहे
-
नियमन आणि पर्यवेक्षण: 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India - RBI)' मार्फत सिडबीचे नियमन आणि पर्यवेक्षणाचे कार्य पार पाडण्यात येते
-
संस्थेचे चेअरमन: सध्या मुहम्मद मुस्तफा हे SIDBI च्या चेअरमन पदावर कार्यरत आहेत