-
भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत (Small Industries Development Bank of India - SIDBI) MSMEs साठी SHWAS आणि AROG नावाच्या २ कर्ज योजनांचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर २ योजनांतर्गत MSMEs तर्फे ऑक्सिजन सिलिंडर्स, ऑक्सिमीटर आणि आवश्यक औषधांच्या पुरवठ्याशी संबंधित उत्पादन आणि सेवांसाठी वित्तपुरवठा करण्यात येईल.
२ नवीन योजना
-
SHWAS – SIDBI assistance to Healthcare sector in War Against Second wave of COVID19.
-
AROG – SIDBI Assistance to MSMEs for Recovery & Organic Growth during COVID19 pandemic.
SIDBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: SIDBI म्हणजेच Small industrial Development Bank of India अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँक होय.
-
स्थापना वर्ष: SIDBI ची स्थापना २ एप्रिल १९९० रोजी झाली होती.
-
संस्थेचे स्वरूप: 'भारतातील एक विकास वित्तीय संस्था' या स्वरूपात सध्या SIDBI कार्यरत आहे.
-
मुख्यालयाचे ठिकाण: SIDBI चे मुख्यालय लखनौ, उत्तर प्रदेश येथे आहे.
-
संस्थेचा उद्देश: उद्योगांना पुनर्वित्त सुविधा आणि अल्प मुदतीसाठी कर्ज देऊ करणे तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील प्रमुख वित्तीय संस्था म्हणून कार्य करणे हा SIDBI चा मुख्य उद्देश आहे.