• संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यामार्फत शॉम्बी शार्प यांची नुकतीच भारतातील 'UN निवासी समन्वयक (UN Resident Coordinator)' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • शार्प हे भारतातील UN संघाचे नेतृत्व करतील तसेच शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताच्या कोविड-१९ प्रतिसाद योजनांच्या दिशेने काम करतील अशी अपेक्षा आहे.

UN बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: UN म्हणजेच United Nations अर्थात संयुक्त राष्ट्रे होय.

  • स्थापना वर्ष: २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती.

  • सरचिटणीस: अँटनिओ गुटेरेस हे सध्या UN च्या सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: न्यूयॉर्क, अमेरिका हे UN च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.