• ओडिशाच्या किनाऱ्यावरून भारताच्या DRDO संस्थेमार्फत नुकतीच अणू-सक्षम 'शौर्य (Shaurya)' क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्षेपणास्त्र हे सुमारे ८०० कि.मी. अंतरावरील लक्ष्याचा अचूक अंदाज घेऊ शकते.

  • उपलब्ध असणाऱ्या विद्यमान क्षेपणास्त्रांच्या तुलनेत हे क्षेपणास्त्र हलके आणि हाताळण्यास सुलभ स्वरूपाचे आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.