• ज्येष्ठ चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री शशिकला ओम प्रकाश सैगल यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • शशिकला यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये विविध सहायक पात्र म्हणून काम केले आहे.

  • २००७ मध्ये सिनेमा आणि कलाविश्वात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल भारत सरकारकडून शशिकला यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • २००९ मध्ये व्ही. शांताराम पुरस्कारांमध्ये त्यांना प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

  • शशिकला यांना 'आरती' आणि 'गुमराह'मधील भूमिकेसाठी २ फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाले आहेत.