• भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळामार्फत (Securities and Exchange Board of India - SEBI) श्री. जी. पी. गर्ग यांची कार्यकारी संचालक (Executive Director - ED) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • श्री. गर्ग यापूर्वी सेबी येथे मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager) म्हणून कार्यरत होते.

  • त्यांनी जानेवारी १९९४ मध्ये सेवेत दाखल झाल्यापासून अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत.

  • सेबीद्वारे राबवण्यात येणाऱ्या देशातील आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदारांच्या शिक्षणावरील पुढाकारांशी त्यांचा जवळचा संबंध आलेला आहे.

SEBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९८८ साली SEBI ची स्थापना झाली. १९९२ साली त्यास वैधानिक दर्जा प्राप्त झाला.

  • सध्याचे अध्यक्ष: अजय त्यागी हे सध्या SEBI च्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे SEBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.