• भारत सरकारमार्फत अश्वनी भाटिया यांची भारतीय स्टेट बँकेचे (State Bank of India - SBI) व्यवस्थापकीय संचालक (Managing Director - MD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ३१ मे २०२२ पर्यंत अर्थात त्यांच्या सेवा निवृत्तीच्या तारखेपर्यंत त्यांची व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

  • श्री. भाटिया हे सध्या SBI म्युच्युअल फंडाचे(SBI Mutual Fund) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.

  • पी. के. गुप्ता यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात येईल.

स्टेट बँक ऑफ इंडियाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्षः रजनीश कुमार हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.

  • सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा बँकेमार्फत पुरवल्या जातात.