• १५ वी जी-२० शिखर परिषद सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली आहे.

ठळक मुद्दे

  • कोविड-१९ साथीमुळे सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलाझिझ अल सौद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सदर परिषदेचे अध्यक्षपद भूषवले.

  • सदर २ दिवसीय शिखर परिषद 'सर्वांसाठी २१ व्या शतकातील संधींची जाणीव (Realising the Opportunities of the 21st Century for All)' या थीम अंतर्गत आयोजित करण्यात आली होती.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर १९ सदस्य देशांच्या प्रमुखांसह परिषदेमध्ये सहभागी झाले होते.

  • १ डिसेंबर २०२० रोजी इटली १६ व्या जी-२० चे अध्यक्षपद स्वीकारेल.

जी-२० बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: जी-२० (G-२०) म्हणजेच Group of Twenty अर्थात २० देशांचा समूह होय.

  • स्थापना वर्ष: १९९९ साली जी-२० ची स्थापना झाली होती.

  • सध्याचे अध्यक्ष: किंग सलमान बिन अब्दुलाझिज अल सौद हे सध्या जी-२० च्या अध्यक्षस्थानावर आहेत.

  • संस्थेचे उद्दिष्ट: आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याबाबत प्रमुख मंच म्हणून प्रत्येक खंडातील विकसित आणि विकसनशील देशांच्या नेत्यांना एकत्र आणणे हे जी-२० चे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • जी-२० गटातील सदस्य देश: युनायटेड स्टेट्स, युरोपियन युनियन, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, टर्की, युनायटेड किंगडम हे जी-२० गटातील सदस्य देश आहेत.