• रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India -RBI) HDFC बँकेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून शशीधर जगदीशन यांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे.

ठळक मुद्दे

  • जगदीशन हे आदित्य पुरी यांची जागा घेतील आणि पुरी निवृत्त झाल्यानंतर ऑक्टोबरमध्ये कार्य पदभार स्वीकारतील.

  • आदित्य पुरी सप्टेंबर हे १९९४ पासून HDFC बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते भारतातील कोणत्याही खाजगी बँकेचे प्रदीर्घ काळ सेवा देणारे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.