• भारतामार्फत ओडीशा किनाऱ्यावरील एकात्मिक चाचणी रेंजवरून (Integrated Test Range - ITR) स्वदेशी विकसित स्टँड-ऑफ अँटी-टॅंक (Stand-off Anti-tank - SANT) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर क्षेपणास्त्र हे अँटी-टँक क्षेपणास्त्र 'हेलिकॉप्टर लॉंचड् नाग (Helicopter Launched Nag - HeliNa)' ची सुधारित आवृत्ती आहे.

SANT क्षेपणास्त्राबाबत महत्वपूर्ण माहिती

  • संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) भारतीय वायू सेनेसाठी विकसित करण्यात आलेले हवेतून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे.

  • या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने १५ ते २० किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेणे शक्य आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.