• नुकतीच संजीव मेहता यांची 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या (Federation of Indian Chambers of Commerce and Industry - FICCI)' अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • मेहता हे सध्या 'हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे (Hindustan Unilever Limited - HUL)' अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत.

  • ते उदय शंकर यांची जागा घेतील.

FICCI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: FICCI म्हणजेच 'Federation of Indian Chambers of Commerce & Industry' अर्थात 'फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री' होय.

  • स्थापना वर्ष: १९२७ साली FICCI ची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे FICCI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: संजीव मेहता हे सध्या FICCI च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • संस्थापक: घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तमदास ठाकूरदास हे FICCI चे संस्थापक आहेत.