• इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत 'स्टार्ट-अप अ‍ॅक्सीलरेटर ऑफ MeitY फॉर प्रॉडक्ट इनोव्हेशन, डेव्हलपमेंट अँड ग्रोथ (Start-up Accelerators of MeitY for pRoduct Innovation, Development and growth - SAMRIDH)' नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर कार्यक्रमाची सुरुवात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत करण्यात आली होती.

  • भारतीय सॉफ्टवेअर उत्पादन स्टार्ट-अप्सना उत्पादन वाढीसाठी तसेच व्यवसाय गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी अनुकूल व्यासपीठ तयार करणे हे सदर कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.