• देशभरातील डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी HDFC बँकेमार्फत ‘सलाम दिल से’ नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर उपक्रम डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेऊन तो साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्य करतो.

  • डॉक्टरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून हा उपक्रम कार्य करेल अशी अपेक्षा आहे.

HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.

  • मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.

  • बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.

  • संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.