• झारखंडचे मुख्यमंत्री श्री. हेमंत सोरेन यांच्यामार्फत राज्याच्या माओवादग्रस्त जिल्ह्यांमध्ये 'युवकांच्या आकांक्षेचा उपयोग करण्यासाठी क्रीडा कृती (Sports Action toward Harnessing Aspiration of Youth)' अर्थात 'SAHAY' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर योजना ही मुख्यत्वे युवा क्रीडा प्रतिभांचे पालनपोषण करण्याच्या उद्देशाने आमलात आणली गेली आहे.

  • गाव ते वार्ड स्तरापर्यंत १४-१९ वयोगटातील मुला-मुलींची या योजनेंतर्गत नोंदणी करून त्यांना बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॉकीमध्ये आपले कौशल्य दर्शविण्याची संधी देण्यात येणार आहे.

झारखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: हेमंत सोरेन हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: रमेश बैस सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १५ नोव्हेंबर २००० मध्ये झारखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती.