-
भारतीय नौदलाकडून घेण्यात आलेल्या ‘सागर कवच (Sagar Kavach)’ नावाच्या २ दिवसीय किनारपट्टी सुरक्षा सरावाचा समारोप झाला आहे.
ठळक मुद्दे
-
सदर सरावाचे कोची येथील संयुक्त ऑपरेशन सेंटरमधून निरीक्षण करण्यात आले आहे.
-
किनारपट्टीची सुरक्षा यंत्रणा तपासण्यासाठी तसेच मानक ऑपरेटिंग प्रक्रियेस मान्यता देण्याच्या उद्देशपूर्तीसाठी आयोजिला जाणारा 'सागर कवच' हा महत्वपूर्ण सराव आहे.
-
केरळ, कर्नाटक आणि लक्षद्वीप किनारपट्टीच्या भागात राबविण्यात आलेल्या या सरावाला देशातील सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या भारतीय नौदल प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे भारतीय नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.