• जम्मू-काश्मीरमध्ये लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्यामार्फत नुकतेच 'स्वयंसहाय्यता गट (Self Help Group - SHG)' महिलांसाठी 'साथ (Saath)' नावाच्या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • महिलांचे जीवनमान बदलणे, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना स्वतंत्र आणि सशक्त बनवणे, बचत गटांशी संबंधित मार्गदर्शन करणे तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे ही या उपक्रमाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरबाबत महत्वपूर्ण माहिती

  • केंद्रशासित प्रदेश: ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: श्रीनगर (उन्हाळी) आणि जम्मू (हिंवाळी) अशा २ राजधान्या आहेत.

  • लेफ्टनंट गव्हर्नर: मनोज सिन्हा हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर विराजमान आहेत.