• रशियामध्ये विकसित करण्यात आलेली 'स्पुतनिक व्ही (Sputnik V)' नावाची कोविड-१९ वरील लस वापरण्यासाठी नोंदविली गेली आहे असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केले. कोविड -१९ वरील लस नोंदविणारा रशिया पहिला देश बनला आहे.

ठळक मुद्दे

  • मॉस्कोच्या गमलेया संस्थेने विकसित केलेली जगातील पहिली कोविड-१९ लस असल्याचा दावा करण्याला रशियातील आरोग्य मंत्रालयामार्फत कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

  • कोरोना विषाणूपासून बचाव प्रदान करणारी प्रतिकारशक्ती देणारी ही चाचणी कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

  • या लसीबाबत देश तसेच परदेशातील बरेच वैज्ञानिक संशयी आहेत. कारण चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण करण्यापूर्वीच लस नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

रशियाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: व्लादिमीर पुतिन हे सध्या रशियाच्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: मॉस्को ही रशियाची राजधानी आहे.