• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) स्टेट बँक ऑफ इंडियावर २ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • RBI बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ अंतर्गत कलम १० च्या काही तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल सदर कारवाई करण्यात आली आहे.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.

SBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय.

  • अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती.

  • संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे.

  • सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.