-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) HDFC बँकेवर १० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
बँकेच्या ऑटो लोन पोर्टफोलिओमध्ये आढळून आलेल्या नियामक अनुपालनातील कमतरतेबद्दल सदर दंड आकारण्यात आला आहे.
-
RBI च्या निरीक्षणानुसार HDFC बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम ६(२) आणि कलम (८) मधील तरतुदींचे उल्लंघन केले आहे.
HDFC बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: HDFC म्हणजेच Housing Development Finance Corporation अर्थात गृहनिर्माण विकास वित्त महामंडळ होय.
-
मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र हे HDFC बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना वर्ष: १९९४ साली HDFC बँकेची स्थापना झाली होती.
-
बँकेची टॅगलाईनः 'We Understand Your World' ही बँकेची टॅगलाईन आहे.
-
संस्थेचा प्रकार: HDFC बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या स्वरूपात कार्यरत आहे.
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.