• गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) ६ सदस्यीय पतधोरण समितीमार्फत धोरण आढावा बैठकीत सलग पाचव्या वेळी कर्जाचे दर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • २०२१ च्या कोरोना विषाणू संसर्गाच्या लाटेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या दरम्यान RBI मार्फत सदर निर्णय घेण्यात आला आहे.

धोरण दर

  • पॉलिसी रेपो दर (Policy Repo Rate): ४%

  • रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate): ३.३५%

  • सीमांत स्थायी सुविधा दर (Marginal Standing Facility Rate): ४.२५%

  • बँक दर (Bank Rate): ४.२५%

  • सीआरआर (CRR): ३%

  • एसएलआर (SLR): १८%

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.