• कोविड-१९ संबंधित तणावग्रस्त मालमत्तांच्या निराकरणासाठी आर्थिक मापदंड सुचविण्याकरिता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India - RBI) ख्यातनाम बँकर के.व्ही. कामथ यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ञ समिती गठीत केली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर समिती RBI कडे ३० दिवसांच्या कालावधीत बदल करण्यासह सूचित करणाऱ्या शिफारसी प्रदान करेल.

  • समितीचे अन्य सदस्य दिवाकर गुप्ता आणि टी. एन. मनोहरन असतील.

  • अश्विन पारेख हे रणनीती सल्लागार म्हणून कार्यरत असतील.

  • भारतीय बॅंक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

RBI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

  • मुख्यालय: मुंबई येथे RBI चे मुख्यालय आहे.

  • स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.