• इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेमार्फत (Equitas Small Finance Bank - ESFB) भारतीय महिला हॉकीपटू राणी रामपाल आणि भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • राणी रामपालच्या नावावर राष्ट्रीय हॉकी संघात खेळणारी सर्वात लहान वयाची खेळाडू बनण्याचा विक्रम आहे

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (Board of Control for Cricket in India - BCCI) स्मृती मंधानाला 'सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू' चा बहुमान प्रदान करण्यात आला आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्ष: अरुण रामनाथन हे सध्या बँकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: वासुदेववन पी. एन. हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: २००७ साली बँकेची स्थापना करण्यात आली होती.