• गुजरातमधील पोरबंदर येथे सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणामार्फत (Marine Products Export Development Authority - MPEDA) गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय नियामक आवश्यकतांनुसार उत्पादनांच्या सुरक्षेबाबतची पुष्टी करण्यासाठी समुद्री खाद्यप्रक्रिया तसेच निर्यातदारांसाठी चाचण्या देईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

  • गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेला समुद्री खाद्य नमुन्यांमधील अँटीबायोटीक अवशेष, शिसे, पारा, जड धातू, कॅडमियम आणि आर्सेनिक तसेच टूना आणि मॅकरेलसारख्या माशांमध्ये अस्तित्वात असणारे हिस्टामाइनचे मूल्यांकन करण्यासाठी प्रगत चाचणी साधनांसह सशक्त केले गेले आहे.

सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाबाबत (MPEDA) महत्वपूर्ण माहिती

  • अध्यक्षः श्री. के. एस. श्रीनिवास हे सध्या MPEDA चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: MPEDA ची स्थापना १९७२ साली झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: कोची येथे MPEDA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.