-
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमार्फत (Indian Space Research Organisation - ISRO) ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (Polar Satellite Launch Vehicle - PSLV) चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
२०२० सालातील इस्रोचे हे पहिलेच मिशन आहे.
-
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन सी ४९ (PSLV C४९) हे PSLV चे ५१ वे मिशन आहे.
-
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून (Satish Dhawan Space Centre - SDSC) सदर प्रक्षेपण करण्यात आले आहे.
ISRO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: ISRO म्हणजेच Indian Space Research Organisation अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था होय.
-
सध्याचे अध्यक्ष: के. सिवन हे सध्या ISRO च्या अध्यक्ष पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १५ ऑगस्ट १९६९ रोजी ISRO ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: बंगळुरू, कर्नाटक हे ISRO च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.