-
देशातील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादक राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित (National Thermal Power Corporation Limited - NTPC) ला व्यावसाईक सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility - CSR) डोमेनमधील प्रतिष्ठीत स्वरूपाचा 'CII-ITC शाश्वतता पुरस्कार (CII-ITC Sustainability Awards) २०२०' प्रदान करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
कॉर्पोरेट उत्कृष्टता विभागामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरीचे कौतुक म्हणून NTPC चा गौरव करण्यात आला आहे.
-
CSR डोमेनमध्ये CII-ITC ने दिलेला हा सर्वोच्च स्वरूपाचा पुरस्कार आहे.
-
कॉर्पोरेट उत्कृष्टता श्रेणीमध्ये पुरस्कार प्राप्त करणारी NTPC ही एकमेव PSU आहे.
NTPC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NTPC म्हणजेच National Thermal Power Corporation Limited अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित होय.
-
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: गुरदीप सिंग हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९७५ साली NTPC ची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NTPC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.