• देशातील सर्वात मोठी प्रीमियर न्यूज एजन्सी 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या (Press Trust of India - PTI)' अध्यक्ष पदावर अवीक सरकार यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • अवीक सरकार हे एमेरिटसचे संपादक आणि आनंद बाजार ग्रुप ऑफ पब्लिकेशन्सचे उपाध्यक्ष आहेत.

  • ते १० वर्षे रॉयल कलकत्ता गोल्फ क्लब (Royal Calcutta Golf Club - RCGC) चे कर्णधार होते.

  • के. एन. शांथ कुमार यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.

PTI बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: PTI म्हणजेच 'Press Trust of India' अर्थात 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे PTI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे अध्यक्ष: अवीक सरकार हे सध्या PTI च्या अध्यक्ष पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २७ ऑगस्ट १९४७ रोजी PTI ची स्थापना करण्यात आली होती.