-
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेतील बहुमत गमावल्याने केंद्रीय मंत्रिमंडळामार्फत पुदुच्चेरीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
कोणत्याही पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केला नसल्यामुळे सदर निर्णय घेण्यात आला आहे.
-
लेफ्टनंट गव्हर्नर तामिळसाई सौंदाराराजन यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती.
-
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर सदर विधानसभेचे विघटन करण्यात येईल.