• भारतामार्फत नुकतीच ओडिशाच्या किनारपट्टीवर स्वदेशी-विकसित, पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या ‘प्रलय’ नावाच्या क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • 'संरक्षण संशोधन विकास संस्थेमार्फत (Defence Research Development Organisation - DRDO)' सदर क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.

  • सदर क्षेपणास्त्र हे ए. पी. जे. अब्दुल कलाम बेटावरून सोडण्यात आले.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.